मोदी सरकारने जाहीर केली नवीन व्हेईकल स्क्रेपेज पोलिसी

News & Updates

मोदी सरकारने जाहीर केली नवीन व्हेईकल स्क्रेपेज पोलिसी

M Y Team दिनांक १३ अगस्त २०२१

मोदी सरकारने आज देशातील सर्वांनी जुनी वाहने वापरणे सोडून सदर वाहने भंगारात विकून टाकावीत या साठी एक जुन्या वाहनांचा वापर थांबवण्यासाठी लोकाना उद्य्युक्त करणारे नवीन धोरण जाहीर केले. १५ वर्षा पेक्षा जुनी  व्यापारी वाहने आणि २० वर्षापेक्ष जुनी खाजगी वाहने याना हे धोरण लागू होईल. एप्रिल २०२२ पर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीची १५ वर्षापेक्षा जुनी वाहने प्रथम बदलण्यात येतील. नंतर सन २०२३ मध्ये व्यापारी वाहनाना या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल आणि २०२४ मध्ये खाजगी वाहनांना या धोरनाची अंमलबजावणी करण्यात येईल.

१५-२० वर्षांची विहित मुदत पूर्ण झालेल्या वाहनांना एका कार्यक्षमता आणि उत्सर्जनाची विहित चाचणी द्यावी लागेल. या चाचणीत नापास ठरलेली वाहने रस्त्यावर वापरता येणार नाहीत आणि सक्तीने भंगारात टाकावी लागतील. या मुदतीत स्वत:हून वाहन मालकांनी वाहने बदलून नवीन वाहने घ्यावीत या साठी सरकार काही प्रोत्साहनपर लाभ सुध्धा देणार आहे. या धोरणा मुले जुनी आणि प्रदूषण करणारी वाहने उपयोगात रहाणार नाहीत त्यामुळे नवीन वाहनांच्या विक्रीत वाढ होईल. तसेच देशातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

हे धोरण संसदेमध्ये रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन जी गडकरी यांनी मार्च मध्ये जाहीर केले होते. त्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे देशात २० वर्षे पूर्ण झालेली ५१ लाख खाजगी वाहने व १५ वर्षापेक्षा अधिक वापरलेली ३४ लाख खाजगी वाहने आहेत. सुमारे १७ लाख मध्यम आणि हेवी व्यापारी वाहने १५ वर्षा पेक्षा जुनी असून त्यातील बहुतेक वाहने वैध पात्रता प्रमाणपत्राविना चालवण्यात येत आहेत. हि वाहने पात्र वाहनांपेक्षा १५ ते २० पट अधिक प्रदूषण करतात.

रस्ते व महामार्ग मंत्रालय आणि गुजरात सरकार यांनी संयुक्तपणे जुनी वाहने तोडणे व भंगार माल विकणे या उद्योगात नवीन गुंतवणूकदार मिळवण्यासाठी एक या क्षेत्रातील उद्योजक, तज्ञ, सरकारी विभाग यांचे एक संमेलन गांधीनगर येथे आयोजित केले असून त्या संमेलनात  केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व गुजरातचे मुख्यमंत्री श्री रूपांनी उपस्थित होते. या संमेलनाचे उद्घाटन श्री नरेंद्र मोदी यांनी केले. या व्हेईकल स्क्रेपेज धोरणामुळे चक्राकार अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास मा. नरेंद्र मोदी यांनी सदर उद्घाटन करताना व्यक्त केला. गुजरात येथील अलंग येथील जहाज तोडन्याच्या उद्यागाचे उदाहरण देऊन हा वाहन तोडन्याचा उद्याग देखिल प्रचंड मोठा होइल असा विश्वास त्यानी व्यक्त केला. श्री नितीन गडकरी यांनी या धोरणामुळे सध्या ७.५ लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेला वाहन उद्योग नवीन वाहनाच्या वाढलेल्या मागणी मुले १० लाख कोटी रुपयांचा होईल आणि हा उद्योग नवीन ५० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल असा विश्वास व्यक्त केला.

====  +  ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *