Ground Report
मोदी सरकारने “५९ मिनिटात कर्ज” योजनेत लाखो लघु उद्योगांना दिले अर्थ सहाय्य
M Y Team दी.१६ फेब्रूअरी २०२१
लघु उद्योजकांना त्वरित कर्ज मिळावे म्हणून मोदीसरकारने “५९ मिनिटात कर्ज” हि योजना योजना १७ जुलै २०१९ रोजी सुरु केली आहे. या योजनेसाठी “ psbloansin59minutes.com” हे विशेष पोर्टल तयार करण्यात आले असून त्यावर ओनलाईन अर्ज करता येतो. हा अर्ज सरकारी बँके कडून पडताळणी करून मंजूर करण्यात येतो. योग्य वाटलेल्या अर्जादाराना तत्वत: मंजुरीचे पत्र देण्यात येते आणि संबंधित पूर्तता झाल्यावर कर्ज वाटप करण्यात येते. याच वेबसाईट वर १ कोटी पर्यंतचे उद्योगासाठीचे कर्ज तसेच व्यक्तिगत, गृह व मुद्रा कर्ज त्या त्या संबंधित नियामानुसार मंजूर केले जाते. यात सामील बॅंका पुढील सर्व प्रोसेस पूर्ण करून घेतात आणि अर्जदाराला मंजूर केलेल्या रकमेचे कर्ज देतात.
या पूर्वी वित्त राज्यमंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना माहिती दीली कि मोदी सरकारच्या लघुउद्योगांसाठी सुरु केलेल्या महत्वाकांक्षी “५९ मिनिटात कर्ज” या योजनेत एकूण २,००,६६० अर्ज दाखल केले गेले त्यापैकी १.५९.५८३ कर्ज अर्जाना तत्वत: मान्यता देण्यात आली आणि १.३३.४४८ अर्जाना प्रत्यक्षात कर्ज वाटप केले गेले आहे. त्या प्रमाणे या योजनेत आत्तापर्यंत १,३३,४४८ अर्जदाराना प्रत्यक्षात कर्ज देण्यात आलेले आहे.
मध्यम लघु उद्योगाना सुरळीतपणे कर्ज मिळावे या साठी मोदी शासन रिझर्व बँकेच्या मदतीने वेगवेगळे उपाय योजत आहे, त्यातीलच हा एक उपाय आहे. रिझर्व बॅंकेने सर्व शेड्युल व्यापारी बँकाना विशेष निर्देश दिले असून त्या मध्ये लघु आणि मध्यम उद्योगांना दिलेल्या कर्जात प्रतिवर्ष २० % वाढ करणे, लघु आणि मध्यम उद्योगांना दिलेल्या एकूण कर्जातील ६०% रक्कम हि सूक्ष्म ( Micro ) उद्योगांना देणे आणि दरवर्षी सूक्ष्म उद्योगांच्या ख्त्यांच्या संख्येत १०% वाढ करणे ई.गोष्टींचा समावेश आहे. यां शिवाय या बँकांनी प्रत्येक जिल्ह्यात एक लघु उद्योग अर्थसहाय्य देणारी शाखा उघडणे प्रत्येक बँकेला सक्तीचे आहे. लघु उद्योगांना त्यांची येणी वेळेवर मिळत नसल्याने त्या बाबतची एक येण्याच्या तारणावर कर्ज देण्याची प्रणाली बनवणे सर्व बँकांवर सक्तीचे केले आहे. हि यंत्रणा Trade Receivables Discounting System (TReDS)c. या नावाने प्रत्येक बँकेमध्ये उपलब्ध आहे.
==== + ====