Development News विकास वार्ता
मोदी सरकारच्या ९ वर्षात मध्यमवर्गीय गुंतवणूकदाराना शेअर बाजाराने दिला उत्तम पर्याय. लेखक विनायक आंबेकर
दिनांक २६ मे २०२३
मोदींनी आपल्या ९ वर्षांच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बळकटी आणली आणि अर्थव्यवस्था प्रगती पथावर नेली आहे, त्याचे परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजाराची झालेली विक्रमी वाढ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. बॅंकातील ठेवीचे व्याजदर कमी होऊ लागल्यावर हवालदिल झालेल्या मध्यमवर्गीय जनतेला पूरक उत्पन्नाचे एक पर्यायी साधन या मुळे उपलब्ध झाले. मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या काळात भारतीय शेअर मार्केट प्रचंड विस्तारली. भारतीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी-५० मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या काळात जवळपास दुप्पट झाला आहे. एव्हढेच नव्हे तर या काळात निफ्टी-५० मध्ये समाविष्ट शेअर्सचे बाजारमूल्य तिपटीने वाढून २८ लाख कोटीवर पोहोचले आहे. या वाढीला मोदी सरकारने केलेली भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती हीच कारणीभूत आहे. या वाढीची माहिती घेतली तर या वाढीमधे विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ( FII ) महत्वाचा वाटा आहे. या ९ वर्षात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर मार्केट मध्ये ४९.२१ बिलियन डॉलर ( सुमारे ४ लाख ६ हजार कोटी रुपये ) किमतीचे शेअर खरेदी केलेले आहेत. या कंपन्यांनी सातत्याने भारतीय शेअर बाजारात खरेदी केली. ९ पैकी फक्त २ वर्षात त्यांच्या खरेदी पेक्षा विक्री जास्त होती. ज्या देशात गुंतवणूक करायची त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचे परीक्षण करून आणि त्या देशातील कंपन्यांची आर्थिक स्थितीचे निरीक्षण करूनच या गुंतवणूकदार कंपन्या कोणत्या देशात गुंतवणूक करायची ते निश्चित करतात. त्या मुळे या गुंतवणूकदार कंपन्यांनी भारतीय शेअरमार्केटवर दाखवलेला विश्वास हा भारतीय अर्थव्यवस्थेवर व भारतातील राजकीय व्यवस्थेवर दाखवलेला विश्वास आहे.
मोदींच्या कार्यकाळात भारतीय शेअर बाजाराने केलेल्या प्रगतीचा खरा फायदा हा भारतातील मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना झालेला दिसून येतो. कोरोना मधील लॉकडाऊन नंतर भारतीय शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात मध्यमवर्गीय भारतीयांनी विक्रमी सहभाग नोंदवलेला आहे. मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे भारताच्या काना कोप-यात उत्तम नेटवर्क आणि डाटा सुविधा पोहोचवल्या गेल्या आहेत. शिवाय मोदींनी केलेल्या मोबाईल क्रांतीने प्रत्येक भारतियाकडे स्मार्ट मोबाईल आहे. या मुळे प्रत्येक भारतीयासाठी घरबसल्या शेअर मार्केट मधील ओनलाईन सहभाग शक्य झाला आहे. आज अनेक भारतीय आपल्या घरातून, ऑफिसमधून एव्हढेच नव्हे तर आपल्या मोबाईल वरून देखील शेअर मार्केट मधील व्यवहार करीत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे कि काही वर्षापूर्वी जर विदेशी गुंतवणूकदार कंपन्यांनी भारतीय शेअर मार्केटमध्ये खरेदी पेक्षा विक्री जास्त केली तर भारतीय शेअर मार्केट कोसळत असे. मात्र गेल्या २-३ वर्षात भारतातील किरकोळ गुंतवणूकदारानी शेअर मार्केट मधील आपला हिस्सा एव्हढ्या प्रमाणावर वाढवला आहे कि विदेशी गुंतवणूक कंपन्यांनी जरी खरेदी पेक्षा विक्री जास्त केली तरी देशी गुंतवणूक संस्था व देशी किरकोळ गुंतवणूकदार यांची गुंतवणूक हि मार्केटवर नकारात्मक परिणाम होऊ देत नाही. विशेष करून गेल्या दोन वर्षात मध्यमवर्गीय भारतीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात केलेली गुंतवणूक तिपटीने वाढली आहे. एका अहवालानुसार मार्च २०२०च्या तिमाहीत ७ लाख २० हजार कोटी रुपये असलेली गुंतवणूक सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत १९ लाख ५० हजार कोटी झालेली होती. त्या मुळे देशी किरकोळ गुंतवणूकदार हा भारतीय शेअर मार्केटमधील महत्वाचा घटक बनलेला आहे.
यात विचार करण्याचा मुद्दा हा या मध्यमवर्गीय गुंतवणुकदारांचा या मुळे काही आर्थिक फायदा झाला आहे का? आणि या भारतीयाना उत्पन्नाचा पर्यायी मार्ग यातून मिळाला आहे का? हा आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार शेअर ट्रेडिंग साठी आवश्यक असणाया डीमेट खात्यांची संख्या १० कोटी पेक्षा जास्त होती. दुसया सर्व्हेनुसार २०२२ मध्ये सुमारे १६% भारतीय हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केलेले किंवा करण्याच्या प्रयत्नात असलेले होते. यात प्रत्यक्ष शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणारे आणि म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करणारे दोन्हीचा समावेश आहे. त्या मुळे सर्व साधारणपणे शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष ट्रेडिंग करून पाहिल्यावर ज्या गुंतवणूकदारांना त्यात चांगले उत्पन्न मिळाले त्या गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मधे गुंतवणूक सुरु ठेवली आणि ज्या गुंतवणूकदारांना अपेक्षित यश मिळाले नाही त्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करण्याचा मार्ग निवडला असे लक्षात येते. म्यूच्युअल फंडात देखील सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) हा पर्याय बराच सोयीचा आणि लोकप्रिय आहे. भारतातील एकूण एस आय पी खात्यांची आजपर्यंतची संख्या ६ लाख ४२ हजार कोटी आहे आणी या खात्याद्वारे गेल्या तीन वर्षात एसआयपी मधे गुंतवलेली एकूण रक्कम ३ लाख ७६ हजार कोटी रुपये आहे. या शिवाय म्युच्युअल फंड चालवीत असलेल्या हजारो योजनामध्ये भारतीयांनी केलेली गुंतवणूक मोठी आहे. सर्व म्युच्युअल फंड आपल्याकडे गोळा होणारा पैसा हा शेअर मार्केट आणि सिक्युरिटी मध्ये गुंतवीत असतात.
थोडक्यात मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळातील डिजिटल क्रांतीमुळे आणि मोदी सरकारने अर्थव्यवस्थेच्या केलेल्या उत्तम प्रगतीमुळे कोट्यावधी भारतीयाना पूरक उत्पन्नाचा योग्य पर्याय उपलब्ध झाला आहे.
Why India Needs Modi ( WIN Modi )