भारतीय अर्थव्यवस्थेची व्ही शेप रिकव्हरी- प्रा. विनायक आंबेकर

Economy

भारतीय अर्थव्यवस्थेची व्ही शेप रिकव्हरी प्रा. विनायक आंबेकर

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर झाल्या पासून कोविद महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाचे स्वरूप व झालेले नुकसान स्पष्ट स्वरूपात जनते समोर आले आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून भारताची अर्थव्यवस्था नक्की कशी सुधारेल याची काळजी जनतेला वाटत आहे. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती सीतारमण यांनी आपली अर्थव्यवस्था व्ही शेप रिकव्हरी करेल असे सांगितले आहे. त्यामुळे व्ही शेप रिकव्हरी म्हणजे काय त्याची माहिती देत आहे. एखाद्या अर्थव्यवस्थेत अलेली  मंदी आणि नंतर झालेला अर्थव्यवस्थेतील सुधार याच्या आकड्यांची अर्थशास्त्रीय चार्ट मधील प्रतिमा जेव्हा इंग्रजी व्ही V या अक्षरा सारखी दिसते तेव्हा त्याला व्ही शेप रिकव्हरी म्हणतात. स्वाभाविक पणे अशी परिस्थिती तेव्हाच येते जेव्हा आर्थिक मंदि ज्या वेगाने येते त्याच वेगाने आर्थिक परिस्थितील सुधार देखील होतो. कोरोना सारख्या अचानक आलेल्या संकटामुळे जेव्हा व्यापार उद्योग अचानकपणे बंद पडतात तेव्हा मोठ्या वेगाने अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते.  जेव्हा असे बंद पडलेले व्यापार उद्योग सुरु होतात तेव्हा त्याच वेगाने अर्थव्यवस्था पुन्हा सुधारु शकते त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था व्ही शेप रिकव्हरी करेल असे विधान अर्थमंत्र्यांनी केले आहे. या पूर्वी अशी व्ही शेप रिकव्हरी अमेरिकन अर्थव्यवस्थेत सन १९२० साली त्या वेळच्या स्पानिष फ्लू महामारी ( १९१८-१९२० ) नंतर आणि १९५३ साली झालेली आहे.

आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय अर्थव्यवस्था व्ही शेप रिकव्हरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या बाबत बोलताना त्यांनी सांगितले कि एप्रिल जून तिमाहीचा विकासदर उणे २३.४ % जाण्याचे मुख्य कारण भारतात लागु केलेली सर्वात कठोर टाळेबंदी आहे. ओक्सफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या Government Response Stringency Index या तालिके प्रमाणे भारत सरकारने जाहीर केलेली टाळेबंदी हि सर्व जगभरातील देशात सर्वात कठोर होती. त्याच्या परिणाम स्वरूप भारतातील सर्वप्रकारचे आर्थिक व्यवहार हे एप्रिल ते जून या तिमाहीत पूर्णपणे बंद होते आणि त्यामुळेच या तिमाहीतील विकासदर हा एव्हढ्या मोठ्यादराने घसरला आहे. मात्र या कठोर टाळेबंदीमुळे झालेला मोठा फायदा म्हणजे या महामारीमुळे झालेल्या मृत्युन्चा दर भारतात फक्त १.७८ % इतका नियन्त्रीत राहिला आहे. हा मृत्यू दर अमेरिकेत ३.०४%, फ्रांस मध्ये १०.०९% तर इंग्लंड मध्ये १२.३५% एव्हढा आहे. भारता सारख्या विशाल जनसंख्येच्या देशात एव्हढा कमि मृत्यूदर ठेवणे फक्त वेळेवर आणि कठोर रीत्या केलेल्या टाळेबंदिमुळेच शक्य झाले आहे.

अर्थ मंत्रालयाने अर्थव्यवस्थेबाबत एक विस्तृत निवेदन जारी केले आहे. सद्य परिस्थितीत व्ही शेप रिकव्हरीचे स्पष्ट संकेत पुढील वेगाने बदलणार्या संकेतांवरून ( High Frequency Indicators) मिळत आहेत असे त्यात सांगितले आहे. या संकेंता मध्ये वहानांची व ट्राकटरची वाढती विक्री, खते व कीटकनाशके यांची वाढती विक्री, स्टील व सिमेंट यांचे वाढते उत्पादन व विक्री, विजेचा वाढता व्यापारी वापर, महामार्गावरील दररोजचे वाढते टोल उत्पन्न, ई-वे बिलांची वाढलेली संख्या, किरकोळ आर्थिक व्यवहारांमधली वाढ अशी अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यात विशेष उल्लेख उत्पादन क्षेत्रातील खरेदी सूचकांकाचा ( Purchasing Managers Index-PMI ) केला आहे. हा सूचकांक टाळेबंदीनंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात ५६ % होऊन वाढीला लागला आहे व  त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील वाढीचे संकेत मिळत आहेत. मे महिन्यापासून कृषी क्षेत्र देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या वाढीतील एक महत्वाचे क्षेत्र म्हणून काम करीत आहे.

फोरीन डायरेक्ट आणि पोर्टफ़ोलिओ गुंतवणुकीतील ( FDI/ FPI ) चांगली वाढ, परकीय चलन साठ्याची विक्रमी परिस्थिती यामुळे जेव्हा प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत वाढ होऊन अर्थ पुरवठ्याची गरज निर्माण होईल ती पूर्ण करण्याची क्षमता आपल्या अर्थ व्यवस्थेत आहे हे नमूद करण्यात आलेले आहे. अंतर्गत अर्थव्यवस्थेत पुरेशी निधीची उपलब्धता असून त्याचाही फायदा कोणत्याही क्षेत्रातील कामकाजात होणार्या उत्पादनातील वाढीला लागणारा अर्थपुरवठा करण्यासाठी होणार आहे.

कोविड महामारीनंतर उत्पादन, उपभोग आणि कामाच्या पद्धती या मध्ये आमुलाग्र बदल होणार आहेत याचा उल्लेख करून या न्यू नॉर्मल वस्तुस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेच्या काही विशिष्ट क्षेत्रांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे सांगितले आहे. या मध्ये उत्पादनाची मुलभूत संसाधने ( Factors ) – जागा-मनुष्यबळ-भांडवल-उद्योजक यावर लक्ष देणे,  शेती मालाबाबत सप्लाय चेन-विक्रीव्यवस्था-कृषी इन्फ्राचा विकास करणे, देशांतर्गत पायाभूत सुविधा-आरोग्य सुविधा-कौशल्य विकास या वर भर देणे, तंत्रज्ञान-आयसीटी-स्टार्टअप या क्षेत्रावर जास्त भर देणे ई. गोष्टीमुळे अर्थव्यवस्थेचा वेगाने व स्थायी विकास होईल असे नमूद करण्यात आलेले आहे. कोरोनामुळे थंडावलेली जीवनावश्यक सेवा व वस्तूसोडून अन्य वस्तू व सेवांची मागणी हि आरोग्याविशयक काळजी मुळे असल्याने कोरोनावरील लस ( Vaccine ) उपलब्ध झाल्यावर या सेवा व वस्तूंची मागणी पुन्हा पूर्ववत होईल.

याच प्रकारची माहिती केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार श्री कृष्णमूर्ती सुब्रमनियन यांनी १५ व्या फायनान्स कामिशनपुढे केलेल्या सादरीकरणात दिली आहे. त्यांनी १६ वेगानी बदलणार्या संकेतांवरून ( High Frequency Indicators) असे मांडले कि भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रतीक्षेपित होत आहे.

====  +  ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *