Economy अर्थव्यवस्था
मोदी सरकारची आर्थिक गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरु. डीएचएफएलच्या वाधवान बंधूंवर आरोपपत्र दाखल
ले.प्रा.विनायक आंबेकर दिनांक २३ जून २०२२
आज सीबीआयने वाधवान बंधूंवर ३४६१५ कोटी रुपयांचा फ्रोड केल्याची तक्रार दाखल केली आहे. कपिल आणि धीरज वाधवान, त्यांच्या डीएचएफएल या कंपनीचे व्यवस्थापक सुधाकर शेट्टी व इतर यांच्यावर तक्रार दाखल केली आहे. याच बरोबर त्यांच्या डीएचएफएल सहित ६ प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांचे सर्व डायरेक्टर यांनाही विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आलेले आहे. सीबीआयने आजपर्यंत दाखल केलेल्या बँक संबंधीत भ्रष्टाचाराच्या केसेस मधील हि सर्वात मोठ्या रकमेची फ्रोडची केस आहे.
युनियन बँकेने केलेल्या १७ बँकांच्या कन्सोर्शियमकडून वाधवान बंधूनी २०१० मध्ये कर्ज घ्यायला सुरुवात केली होती. मोदी सरकार आल्यावर त्यातील अनेक कर्जे वेळोवेळी एनपीए दाखवली गेली आणि त्यांच्या सर्व बँकातील खात्यांचे १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेम्बर २०१९ पर्यंतच्या काळाचे रिव्ह्यू ऑडिट करून घेण्यात आले. त्यानंतर १ फेब्रुवारी २०१९ रोजी सर्व बँकांनी एकत्र मीटिंग घेऊन त्या रिव्ह्यू ऑडिट रिपोर्टचा अभ्यास केला आणि समोर आलेल्या गैरव्यवहारा बाबत या ग्रुप विरुध्द रीतसर तक्रार करण्यात आली. १८ ऑक्टोबर २०१९ला या दोघांनी परदेशात पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या विरुध्द लूकआउट नोटीस काढण्यात आली. याच वाधवान बंधूंचा हात येस बँक, पंजाब महाराष्ट्र बँक, डीएचएफएल कंपनी आणि उत्तरप्रदेश पीएफ घोटाळा या प्रकरणात देखील आहे. या दोन्ही बंधूना अटक केली असून ते जेल मध्ये आहेत.
कोरोना काळात याच वाधवान बंधूनी त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील नेत्यांशी असलेल्या संबंधातून लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून महाबळेश्वरला प्रवास केल्याने यांचे नाव प्रसिद्ध झाले होते. यांनी केलेल्या घोटाळ्यात कर्ज घेऊन उभारलेली रक्कम दुस-या कामासाठी वापरणे, कृत्रिम रीत्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढवणे, पैशाची हेराफेरी ई. आरोप यांच्यावर आहेत. प्रत्येक बँकेतून घेतलेल्या कर्जाची नीट परतफेड न करणे इ. अनेक आरोप लावलेले आहेत. मात्र असे असताना सुद्धा २०१० पासून २०१५ पर्यंत याना वारंवार अनेक बँकांकडून कर्जे कशी मिळत होती हा एक प्रश्नच आहे. मात्र त्याचा अंदाज आपल्याला पुढील माहितीवरून घेता येईल. येस बँकेच्या राणा कपूर यांनी काही दिवसापूर्वी जाहीर आरोप केलेला होता कि प्रियांका गांधीनी त्याना एम एफ हुसेन यांचे एक पेंटिंग दोन कोटी रुपयाला विकले होते आणि ते न घेतल्यास त्याना निट धंदा करता येणार नाही अशी धमकी पण कॉंग्रेस कडून दिली होती.
थोडक्यात मोदी राजवटीत बँकातील एनपीए वाढले अशा उलट्या बोंबा मारणाया सर्व अर्थतज्ञांनी वाधवान बंधूंची व त्या सारखी सर्व कर्जे निट तपासून घेणे आवश्यक आहे. मोदी राजवटीत युपिए काळात दिलेल्या चुकीच्या कर्जांची तपासणी सुरु झाली आणि त्यांची नियमानुसार एनपीए प्रोव्हिजन करणे सक्तीचे करण्यात आले होते त्या मुळे एनपीए वाढून दिसले होते.