News & Updates- Kisan
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने २०२०-२१ या वर्षात दिले १,१४९ कोटी
M Y Team दिनांक २३ जुलै २०२१
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने केंद्रातील मोदी सरकारने 2020-21 या वर्षात बारा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एकूण 1,149.10 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. मोदी सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण शेतकर्यांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्स्फर करण्याच्या डीबीटी ( Direct Benefit Transfer ) पद्धती मुळे हे पैसे १००% शेतकऱ्यांच्या हातात पोहोचले आहेत. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून छोट्या शेतकर्याना दिले जाणारे वार्षिक प्रत्येक रु.६००० तर स्वतंत्रपणे दिले जात आहेतच.
लोकसभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी अतारांकित प्रश्नाद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी घेतलेल्या पावलांचा तपशील मागवला होता. त्यातून ही सगळी माहिती समोर आली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कुठल्या योजनेसाठी किती निधी दिला याचा तपशील दिला
- राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन साठी 153.36 कोटी
- पीएमकेएसवाय च्या प्रति बुंद अधिक पीक घटकांच्या योजनेत 400 कोटी
- एनएफएसएम ( ओएस अंड ओपी ) योजनेसाठी 39.38 कोटी रुपये
- कृषी मशीनीकरणवर उप मिशन साठी 77.92 कोटी रुपये
- मृदा आरोग्य व्यवस्थापन योजनेसाठी 0.46 कोटी रुपये
- मृदा आरोग्य कार्ड योजनेसाठी 5.69 कोटी रुपये
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 290.88 कोटी रुपये
- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी योजनेसाठी 17.41 कोटी रुपये
- आर ए डी स्कीम साठी दहा कोटी
- एकात्मिक विकास मिशन फलोत्पादनासाठी 130 कोटी रुपये
- सब मिशन ओन अग्रो फॉरेस्ट्री साठी दोन कोटी
- परंपरागत कृषी विकास योजनेसाठी 13 कोटी रुपये देण्यात आले.
पाच वर्षात राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने बारा योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुमारे 6353.97 कोटी रुपये चे वाटप केले आहे. मोदी सरकारला शेतकरी विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करणार्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी हि माहिती आहे.
सौजन्य- कृषी जागरण मराठी
https://marathi.krishijagran.com/news/central-govgive-to-1149-crore-for-farmer-incom-double/