प्रधानमंत्री मोदीनि अमेरिकन उद्योजकांना भारतात व्यवसायवृद्धीसाठी दिले आमंत्रण
M Y Team दि २३ जुलै २०२०
“भारताच्या आर्थिक विकासाचा अर्थ एका विश्वासू देशात व्यवसायाच्या उत्तम संधींमध्ये वाढ होणे आहे त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो. आज भारतात उर्जा, पायाभूत सुविधा, सरंक्षण साहित्य, शेती व अन्नप्रक्रिया उद्योग, आरोग्य सेवा हि वेगाने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. भारत आणि अमेरिका याची द्विपक्षीय भागीदारी यापूर्वी अनेक क्षेत्रात याशस्वी झाली आहे आणि आता संपूर्ण जगाला कोरोना मुळे आलेल्या जागतिक मंदीतून सावरण्यासाठी मदत करेल. अशाप्रक्र्च्या कार्या साठी अमेरिकेला भारत हा सर्वात जास्त योग्य भागीदार आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही जगातल्या सुदृढ लोकशाही असलेल्या देशामध्ये उद्योग व्यवसायातील भागीदारी असणे हे सहज शक्य आहे कारण दोन्ही देशांचा लोकशाही मुल्यांवर विश्वास आहे.” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आयडीया समीटला उद्बोधित करताना अमेरिकेतील उद्योग जगतातील आघाडीच्या उद्योजकांना केले. “जास्त चांगल्या भविष्याची निर्मिती” Building a Better Future या संकल्पनेवर आधारित अशी हि वर्चुअल समीट काल पार पडली त्या प्रसंगी ते बोलत होते. युएस इंडिया बिझनेस कौन्सिल या संघटनेतर्फे या समीटचे आयोजन करण्यात आले होते.
भारतात गुंतवणूक करण्यातील फायदे त्यांनी सविस्तर विषद केले. त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत असे सानितले त्य क्षेत्राविषयी भारतात काय सुविधा उपलब्ध आहेत त्याचे सविस्तर वर्णन केले. फोरीन डायरेक्ट इंवेस्टमेंट विषयीच्या धोरणात आपल्या सरकारने काय सुधारणा केल्या त्याची माहित दिली. गेल्या काही वर्षात त्यांच्या सरकारने केलेल्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी काही वैशिष्ट्य पूर्ण गोष्टींचा उल्लेख केला. भारतात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील इंटरनेटचा वापर करणार्या व्यक्तींची संख्या शहरी भागातील इंटरनेट वापरनार्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा जास्त आहे हे त्यांनी सांगितले. भारतात ५० कोटी लोक हे नेटवर्क वापरतात त्यामुळे भारतात ५ जी, बिग डेटा अनेलटिक्स, ब्लोकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्स ई.साठी फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत हे त्यांनी सांगितले. भारतात मुक्त विचारांचे लोक, मुक्त विचारांचे सरकार, मुक्त अर्थव्यवस्था असे व्यवसाय पूरक वातावरण आहे याचा उल्लेख करून आपल्या सरकारने ईज ऑफ डुइंग बिझनेस साठी केलेल्या उपाय योजनांची त्यांनी माहिती दिली. भारताचा आत्मनिर्भरतेचा मंत्र हा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था लवकर सुधारावी या साठी उपयोगी पडेल कारण सुदृढ भारत ईतर देशाना मदत करू शकेल असे त्यांनी स्पष्ट केले.
या समिट मध्ये भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची देखील भाषणे झाली. या समिटमध्ये भाषण करताना अमेरिकन डिफेन्स सेक्रेटरी यांनी भारत आणि अमेरिकेची संरक्षण क्षेत्रातील भागीदारी हि २१व्या शतकातील सर्वात महत्वाची भागीदारी आहे असे सांगितले. भारतीय आणि अमेरिकन उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंत उद्योगपती आणि मुख्य अधिकारी या समीट मध्ये सहभागी झाले होते. युएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या स्थापनेला या वर्षी ४५ वर्षे पूर्ण झाली असून २०१९ मध्ये त्यांच्या पहिल्या इंडिया आयडीया समीटला वाशिंग्टनमध्ये ४०० प्रतिनिधी उपस्थित होते. कोविद संकटाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ई समीट घेण्यात आली.
==== + ====