द मॅन, हिज व्हीजन अँड अवर नेशन ( भाग -१ ) प्रा विनायक आंबेकर
२०१६ साली श्री नरेंद्र मोदी यांच्यावर ” नरेंद्र मोदी- एका कर्म योग्याची संघर्षगाथा ” नावाचे एक पुस्तक मी बराच अभ्यास करून लिहिले होते. २०१४ च्या प्रचंड विजयानंतर श्री मोदींच्या वर अनेक प्रसिद्ध लेखकांनी भरपूर लिखाण केले असताना मी वेगळं काय लिहिलं असा प्रश्न स्वाभाविक आहे. मी त्या पुस्तकाचा विचार युवा आणि तरुणवर्ग डोळ्या समोर ठेवून केला होता आणि आणि मोदीजींच्या मुख्यमंत्री पदापर्यंतच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्या मध्ये युवा वर्गाने घ्यावे असे त्यांचे वेगळे गुण कोणते याचे मुद्दे काढून त्याचे विवेचन दिले होते. श्री मोदी यांची व्हीजन ही फार वेगळी आणि फार दूरवरचा आणि शाश्वत विकासाचा विचार करणारी आहे असे माझे ठाम मत आहे. त्यांच्या कारकिर्दीला सहावर्षे पूर्ण झाल्यावर खरच मोदीजींनी भारतासाठी वेगळं काय केल आणि भारताच्या विकासाची त्यांची दूरदृष्टी ( vision ) नक्की कशी वेगळी आहे आणि त्यांचे भारताच्या विकासाचे मोडेल चिरंतन विकासाचे ( Sustainable Development ) कसे आहे याविषयीची माझी मते मांडत आहे.
– २०१४ साली मोदींच्या मोडेलमधली पहिले वैशिट्य त्यांनी भारतात पहिल्यांदा भारतीयांची मानसिकता बदलण्याचा विचार व प्रयत्न केला. १५ ऑगस्टच्या आपल्या पहिल्या भाषणात भव्यदिव्य स्वप्न आणि अलंकारिक भाषा न वापरता त्यांनी देशातील स्वछ्तेच्या बाबतच्या भयाण वास्तवाचे वर्णन करण्याचे धाडस केले आणि त्या बरोबरीने ते आव्हान स्वीकारत असल्याची घोषणा करून स्वछ भारत अभियान पुढील वर्ष भरात राबवून दाखवले. त्याच बरोबरीने मुलींच्या जन्मदरातील तफावती बद्दल माहिती दिली आणि बेटी बचाव बेटी पढाव योजनेची घोषणा केली. भारतात शाळेत स्वछ्तागृह नसल्याने गावा गावातील मुली शाळेत जात नाहीत हे आणि लक्षावधि भारतीय खुल्यावर शौच करतात हे सत्य सर्व जगासमोर मांडायला ते कचरले नाहीत कारण त्यांनी त्यावरची उपाय योजना तपशीलवार तयार केली होती आणि त्या सत्याची माहिती देतानाच उपाय कसा, कधी आणि केव्हापर्यन्त पूर्ण करणार हे देखील संगितले होते. या मोदीजींच्या प्रयत्नाला मोठे यश मिळाले असून स्वछता या बाबत भारतीयांच्या मनात कायम स्वरूपी जागृती झालेली आहे.
– त्यांच्या मॉडलचे दुसरे वैशिष्ठ्य त्यांनी पहिल्यांदा म.गांधीच्या आणि पं.दीनदयाळ उपाध्याय यांची अंत्योदयाची कल्पना प्रत्यक्षात आणन्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्ष होऊन गेली होती परंतु देशातील मोठा वर्ग गरीब, बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर, तंत्रज्ञानाच्या सुविधा पासून वंचित, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित होता. त्याच्या समोर मदतीचे तुकडे टाकून त्याला आहे तिथेच ठेवायचा राजकीय डाव खेळलेला दिसत होता. यावर ठोस उपाय म्हणून त्यांनी या वर्गाचे सबलीकरण करून त्यांचे जीवनमान कायमस्वरूपी उंचवावे या साठि जनधन, स्वछ भारत, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, दीनदयाळ ग्रामीण विद्युतीकरण योजना आणि आरोग्य सुविधांसाठी आयुष्मान भारत अशा योजना टप्प्या टप्प्याने आणल्या. आणि प्रथम भारताच्या सर्व खेड्यापर्यन्त वीज आणि नंतर भारतातील सर्व घरात वीज पुरवून दाखवली. आणि या वर्गाला कायमस्वरूपी स्वावलंबी बनवले.
– पारदर्शकतेचा आग्रह हे त्यांच्या मोडेलचे तीसरे वैशिष्ठ्य आहे. गरीब वर्गाचा विकास करताना मोदींजिनि देशाच्या दीर्घकालीन फायद्याचा विचार करून पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त देशाच्या राजकारणात पहिल्यांदा आणली आणि त्यासाठी प्रचंड पूर्वतयारी आणि नियोजन केले. अकार्यक्षम म्हणून बदनाम असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचार्याकडून दूरवरच्या खेड्यातील ३४ कोटी अशिक्षितांची जनधन बँकखाती उघडून घेण्याचे काम फक्त मोदीजीनि करून दाखवले. या खातयतून आजपर्यन्त शासनाने दिलेली लाखो कोटी रुपयांची मदत गरिबांच्या पर्यन्त १०० % पोहोचली. ही पारदर्शक्तेची शिस्त आता आपल्या देशात कायमची राहील. शासनाची मदत लाभर्थ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीनेच जाईल. मोदीजींनी आपल्या दूरदृष्टीने देशाच्या राजकारणाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड त्यांनी कायमस्वरूपी नष्ट केली आहे. जनधन हा एक विश्व विक्रम म्हणून जगभरात गौरवला गेलेला आहे. जनधन-आधार-मोबाइल या द्वारे डिजिटल व्यवहार देखील वाढले आहेत जे भविष्यकाळासाठी महत्वाचे आहे.
– सर्व समावेशक विकासाला प्राधान्य हे त्यांच्या मोडेलचे पुढील वैशिष्ठ्य आहे. अनुसूचीत जाती जमाती आणी महिला यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी स्टँडअप इंडिया, सर्व जाती जमातींच्या छोट्या व्यवसायिकांसाठी मुद्रा कर्ज योजना, आणि युवकांसाठी स्टार्टप इंडिया योजना आणून त्यांनी या वर्गाला स्वावलंबी बनायला मोठी मदत केली आहे. दलित युवकांनी रोजगार देणारे व्हावे रोजगार मागणारे राहू नये हा त्यांचा आग्रह अनेक दलित युवकांना प्रेरणा देणारा ठरला. दलित कुटुमबांसाठी राबवलेल्या विशेष आवास योजनेमुळे त्यांना हक्काचे घर मिळाले. मुद्रा कर्ज योजनेमुळे शहरी व ग्रामीण भागातील अनेक छोट्या व्यवसायिकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता आला त्यामुळे तेव्हढी कुटुंबे कायमस्वरूपी स्वावलंबी झाली. सामावून घेणारा विकास ( Inclusive Growth ) हे मोदींचे वैशिट्य किंवा वेगळेपण आहे.
– गरिबांची काळजी आणि त्यांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न हे मोदी मॉडलचे पुढील वैशिट्य आहे. सर्व गरीबवर्गासाठी सामाजिक सुरक्षा प्रदान करणार्या पी एम सूरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि पी एम जीवन विमा योजना या मोदींच्या कल्पक दूरदृष्टीचा मोठा पुरावा आहेत. वार्षिक फक्त १२ रुपयांमध्ये २ लाखांचे अक्सीडेंट वीमा कव्हर मिळाल्याने गरीब वर्ग सुरक्षित झाला आणि जीवन वीमा किंवा अटल पेन्शन योजने सारख्या अल्पदरातील योजनांमुळे गरीब वर्गाला सूरक्षा मिळाली. जनधन, सूरक्षा विमा अशा योजनांमुळे गेली अनेक वर्षे असुरक्षित भारतीयांना न्याय मिळाला आणि आहेरे आणि नाहीरे वर्गांमधील दरी कमी करण्यात मोदी यशस्वी झाले. लोककल्याणकारी राज्य ही घटनाकारांना अपेक्षित संकल्पना केवळ भाषणापुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात आणली हे मोदीजींचे वैशिष्ठ्य किंवा वेगळेपण आहे. तसेच उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर हे सुद्धा दुसरे वैशिष्ठ्य आहे.
– अल्पभूधारक शेतकरीवर्गासाठि तीन हफत्यांमध्ये रोख मदत देणारी पी एम किसान योजना ही शेतकर्यांना बी बियाणे खरेदी साठि मदत देण्याची योजना मोदींच्या दूरदृष्टीचा वेगळा आहे. ज्याला स्वतच्या शेती मध्ये कष्ट करून कमवायचे आहे त्यांना सावकारांच्या फासा मध्ये अडकायला लागू नये असा विचार करून योजलेली ही योजना आहे. ही रोख मदत शेती हंगामामध्ये आवश्यकत्या वेळीच देण्यात येते. आवश्यक तेव्हढेच पैसे दिल्यामुळे शेतकरी परावलंबी होत नाही आणि अडचणीत मदत मिळाल्याने शेती करण्यास उद्युक्त देखील होतो.
विविध व्यक्तिना डोळ्यासमोर ठेवून मोदींनी दूरदृष्टिनी केलेली कामे आणि आणलेल्या योजना या लेखात सादर केल्या आहेत. मोदींच्या भारताचा आर्थिकविकास, आंतर्राष्ट्रीय नेतृत्व या संबधीच्या धोरणाविषयीची माहीती पूढील भागात देत आहे.