प्रधानमंत्री वय वंदना योजना ( P. M. Vay Vandana Yojana ) संकलक डॉ. मिलिंद संपगावकर

Yojana Pages- For All

प्रधानमंत्री वय वंदना योजना ( P. M. Vay Vandana Yojana ) संकलक डॉ. मिलिंद संपगावकर

योजनेचे नाव                    : प्रधानमंत्री वय वंदना योजना

मंत्रालय                        : अर्थ मंत्रालय व लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन

वेबसाईट/ पोर्टल                  : www.licindia.in

योजनेचे उद्दिष्ट                 : भारताची अर्थव्यवस्था सुदृढ होत असताना व्याजाचे दर हे कमी कमी होत आहेत. साठ वर्षाहून जास्त वय असलेले सीनियर सिटीजन हे व्याजाच्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करीत असतात.  व्याजाच्या कमी जास्त होणार्या होणाऱ्या दरामुळे त्यांना जगण्यात अडचण निर्माण होऊ नये तसेच त्यांना म्हातारपणी समाजिक सुरक्षा मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेत त्यांना निश्चित दराने पेन्शन दिली जाते.

 

योजनेचे स्वरूप                : लाईफ  इन्शुरन्स कार्पोरेशन द्वारा या योजनेत ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीना विमा पोलिसी दिली जाते. या पोलीसीवर खात्रीशीर ७.४ % प्रतिमहिना दराने परतावा देण्यात येतो. हि योजना १० वर्षे मुदतीसाठी आहे. या वर्षी २६ मे २०२० पासून हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत  ३१ मार्च २०२३ पर्यंत सामील होता येईल. या योजनेत एकरकमी पैसे गुंतवायचे असतात. पेन्शनची किमान रक्कम दरमहा रु.१००० हजार आणि कमाल रक्कम दरमहा रु.९२५० मिळू शकते. विमा धारकाचे वय लक्षात घेऊन गुंतवणुकीची रक्कम निश्चित होते. जास्तीत मिळणार्या पेन्शनची रक्कम पहाता या योजनेत कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त सुमारे १५ लाखापर्यंत रक्कम गुंतवू शकते असे दिसते आही. सदर रक्कम एकरकमी गुंतवायची असते. दहा वर्षात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नोमिनीला संपूर्ण रक्कम विमा क्लेम म्हणून दिली जाते.

योजनेसाठी पात्रता                : सदर योजना वयाची ६० वर्ष पूर्ण झालेल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे. ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही वर्षी या योजनेत सामील होता येते.

 

योजनेत सहभाग कसा घेता येईल      : लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशनच्या ठिकठिकाणच्या शाखांमधून तसेच सदर कार्पोरेशनच्या एजंटामार्फत आपल्याला पोलिसी खरेदी करता येईल. सर्व साधारण विमा पोलिसी घेताना द्यावे लागणारे कागदपत्र या पोलेसी साठी द्यावे लागतात.

योजनेची ईतर माहिती            : या योजनेत विमा पोलिसी खरेदी करण्याकरता पेन कार्ड, आधार कार्ड, राहिवासी दाखला ( स्टे प्रूफ ), फोटो आणि धनादेश एव्हढेच कागद पत्र द्यावे लागतात. विमाधारकाला किंवा त्याच्या पत्नीला गंभीर आजार झाल्यास ती व्यक्ती या योजनेतून बाहेर पडू शकते. त्यांनी गुंतवलेल्या रकमेच्या ९८% रक्कम त्याला परत मिळते. या योजनेतील पोलिसिवर कर्ज मिळू शकते. पोलिसी घेतलेल्या वर्षानंतर ३ वर्षांनी या पोलिसीवर कर्ज मिळू शकते जे सम इंशुरड पोलीसिच्या ७५ % टक्के असते आणि त्यावर दर साल दर शेकडा ९.५ % दराने व्याज आकारले जाते.

संकलक : डॉक्टर मिलिंद संपगावकर LIC Agent

====  +  ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *