Business-बिजनेस
इन्व्हेस्ट इंडिया ( Invest India-National Investment Promotion & Facilitation Agency )
M Y Team दिनांक २४ फेब्रुअरी २०२३
हि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरणे आणि प्रसार विभागाने २०१५ साली कंपनी कायद्याच्या सेक्शन ८ खाली स्थापन केलेली नफ्यासाठी काम न करणारी कंपनी आहे. हि कंपनी एकूण चार प्रकारची महत्वाची कामे करते. १) भारतामध्ये गुंतवणूक करू इच्छिणा-या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी सिंगल पोइंट कोन्तेकट एजन्सी म्हणून काम करते. २) स्टार्टअप इंडिया योजनेसाठी देखील हि कंपनी कार्यान्वयन विभाग म्हणून काम करते. ३) प्राइम मिनिस्टर सायन्स एंड टेक्नोलोजी इनिशिएटीव्हद्वारे हि कंपनी जगभरातील अद्ययावत तंत्रज्ञान भारतातील डिफेन्स, शेती, आरोग्य इत्यादी क्षेत्रामध्ये आणण्यासाठी काम करते. ४) केंद्र सरकारच्या मोठ्या भागाचे संगणकीकरण करण्याचे महत्वाचे काम देखील हि कंपनी करते. या मध्ये प्रधानमंत्र्यांचा डेशबोर्ड ज्या वरून ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे व विकासाच्या प्रगतीचे नियंत्रण करतात त्याचाही समावेश आहे. हि कंपनी केंद्र सरकारच्या मालकीची आहे. जगभरातील सर्व देशातून गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी व भारतातील गुंतवणुकीच्या संधींचा प्रचार प्रसार करण्यासाठी जागतिक दर्जाची व्यावसायिक सेवा पूरवणे अपेक्षित होते. सरकारी विभागाकडून हि अपेक्षा पूर्ण होणे अवघड आहे असा आजवरचा अनुभव असल्याने मोदींनी हि कंपनी स्थापन केली व इन्व्हेस्ट इंडिया हा प्लेटफॉर्म त्यांच्या ताब्यात दिला. हि कंपनी जगातील सर्व देशांबरोबर व भारतातील सर्व राज्यांबरोबर काम करते. त्याच प्रमाणे हि कंपनी केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालायांशी समन्वय साधते. भारतात गुंतवणूक करू इच्छिणा-या प्रत्येक गुंतवणूकदाराला व्यावसायिक तत्वावर सल्ला, मार्गदर्शन आणि सुविधा पुरवण्याची सेवा हि संस्था देते. हि संस्था देशातील व परदेशी गुंतवणूकदाराला भारतात उद्योग सुरु करण्यापर्यंतच्या व नंतर लागणा-या सर्व सेवा एकाच छत्राखाली देते. या संस्थेत देशभरात मिळून ४५० पेक्षा जास्त तद्न्य व्यावसायिक काम करतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या आयआयटी व आयआयएम मधून प्रशिक्षित आहेत त्यातील बहुतेकांनी आपल्याला त्या त्या वेळी मिळणाया पगारात ७% ते ९३% कमी पगार स्वीकारून हि कंपनी देशसेवेसाठी निवडलेली आहे. हि एजन्सी गुंतवणूक करण्यापूर्वीची धोरणे ठरवणे, आवश्यक ती माहिती गोळा करणे, जमीन मिळवणे, इन्फ्रा गुंतवणुकीच्या संधी शोधून देणे, प्रकल्प सुरु होई पर्यंत प्रत्यक्ष सल्ला व सेवा आणि प्रकल्प सुरु झाल्यावर आवश्यक सेवा देखील पुरवते. या कंपनीतील वेगवेगळ्या टीम नवीन गुंतवणूकदारांना भारतातील गुंतवणूक संधींची पूर्ण माहिती देतात आणि पुढील प्रक्रियेत मदत करतात.
या कंपनीने गुंतवणूक क्षेत्रात केलेले काम- गेल्या ९ वर्षात १ कोटी १७ लाख ३३ हजार लोकांनी या कंपनीच्या वेबसाईटला भेट दिली आहे. या कंपनीद्वारे एकूण ३४१४५६ बिझनेस रिक्वेस्ट हाताळण्यात आल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून २०२२ पर्यंत भारताला एकूण ९५० बिलियन डॉलर एफडीआय मिळाला त्या पैकी ५३२ बिलियन डॉलर एफडीआय या कंपनीद्वारे गेल्या ९ वर्षात मिळालेला आहे. एव्हढी ४६ लाख ५६ हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक १६२ देशातून आलेली आहे. हि गुंतवणूक ६१ विविध क्षेत्रात ३१ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात मिळालेली आहे. हि कंपनी स्थापन झाल्या पासून प्रतिवर्षी आधीच्या वर्षी पेक्षा जास्त गुंतवणूक मिळवते आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु असताना देखील त्या वर्षात ८३.५० बिलीयन एफडीआय मिळवला गेला. विशेष म्हणजे या एकूण थेट परकीय गुंतवणुकी पैकी ९३ % गुंतवणूक हि ओपन डायरेकट मार्गाने म्हणजे कोणत्याही विशेष पूर्वपरवानगीविना आलेली आहे.
परकीय गुंतवणूक म्हणजे नुसते डॉलर नव्हेत तर त्या मागे तुमच्या देशावरचा, तुमच्या राजकीय व्यवस्थेवरचा, तुमच्या राजकीय नेतृत्वाच्या विश्वासार्हतेवरचा, तुमच्या देशातील संधी वरचा, तुमच्या देशाच्या भविष्यावरचा, तुमच्या उत्तम धंद्यासाठी साथ देण्याच्या क्षमतेवरचा विश्वास महत्वाचा असतो.
===