Business- बिजनेस
इलेक्ट्रॉनिक क्लस्टरनंतर केंद्रसरकार राज्यात टेक्सटाईल पार्क उभारणार, फडणवीसांनी दिली माहिती
M Y Team दिनांक ३१ओक्टोबर २०२२
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतंच महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (Electronic Manufacturing Cluster) येणार असल्याची घोषणा केली होती. केंद्र सरकार महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक हब (Electronic Hub in Maharashtra) म्हणून घोषित करणार आहे. सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. हा प्रकल्प म्हणजे राज्यासाठी केंद्र सरकारने दिलेलं गिफ्टच आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणाले आहेत. यासोबतच, नवीन वर्षांत महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्कदेखील (Textile Park) देणार आहे आणि राज्यात टेक्सटाईल क्लस्टर (Textile Cluster) तयार होणार आहे, याचं प्रपोजल अंतिम टप्प्यात सादर झालं आहे. बजेटपर्यंत याची घोषणा होऊ शकते, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मागच्याच कॅबिनेटमध्ये सरकारने २५ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. जरी त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली गेलेली नाही. आज पुन्हा एकदा २५ हजार कोटींचं प्रपोजल एका मिटिंगमध्ये मान्य झालं आहे, ही महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक आहे, असे त्यानी सांगितले.
ते म्हणाले गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. आजपर्यंत देशामध्ये कधीच गुंतवणूक झाली नाही इतकी सेफ गुंतवणूक रिफायनरीमध्ये आहे. यामुळे ३ लाख कोटीपेक्षा गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. तसंच, १ लाख लोकांना थेट रोजगार, इतर रोजगार मिळणार आहे. पण अशा रिफायनरीला पूर्वीपासून राजकीय विरोध केला जातोय. रिफायनरी होणारच, ती अंशत: महाराष्ट्रात आणि अंशत: केरळमधे करावी अशी चर्चा चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रातच पूर्ण रिफायनरी करण्याचा प्रयत्न आमचे सरकार करीत आहे असंही फडणवीस म्हणाले.