केंद्र सरकारने गंगा विलास रिव्हर क्रुजची तारीख जाहीर केली

News & Updates ताजा खबरे

केंद्र सरकारने गंगा विलास रिव्हर क्रुजची तारीख जाहीर केली

M Y Team दिनांक २५ दिसंबर २०२२  

केंद्र सरकारच्या बंदरे जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने  १३ जानेवारी २०२३ रोजी ‘गंगा विलास’ हे आलिशान क्रूझ जहाज जगातील सर्वात लांब ‘रिव्हर क्रूझ’ साठी काशीहून मार्गस्थ होणार आहे अशी घोषणा केली आहे. वाराणसीहून हे जहाज ५० दिवसात सुमारे ४०००  की मी अंतर पार करत आणि बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगडपर्यंत प्रवास करणार आहे.

१८ आलिशान रूम्स आणि सर्व सुखसुविधा असलेले ६२.५ मीटर लांब आणि १२.८ मीटर रुंद ‘गंगा विलास’ भारत आणि बांगलादेशातील २७ नदी प्रणालींमधून मार्गक्रमण करत ५० दिवसांत हे अंतर कापणार आहे. ‘गंगा विलास’ हे पहिले भारतात बांधलेले ‘मेड इन इंडिया’ ‘रिव्हर क्रूझ’ जहाज आहे.

हे जहाज ५० दिवसांच्या प्रवासादरम्यान, जागतिक वारसा स्थळांसह ५० हून जास्त पर्यटनस्थळे दाखवत, सुंदरबन डेल्टा, काझीरंगासह राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमधून जाईल. एका नदीवरील जहाजाने केलेला हा प्रवास जगातील सर्वात लांब असेल आणि या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशला जागतिक क्रूझ-पर्यटन नकाशावर आणले गेले आहे.

आलिशान क्रूझ मधून प्रवास एवढंच नाही, तर भारताची गौरवशाली कला, संस्कृती, इतिहास, हेरिटेज वास्तू, अध्यात्म याची ओळख हा प्रवास करून देणार आहे. ‘गंगा विलास’ मधील आलिशान रूम्स म्हणजे सांस्कृतिक लूक आणि आधुनिक सुविधांचे फ्युजन आहे..

यामध्ये शॉवरसह स्नानगृह, कन्व्हरटेबल बेड, फ्रेंच बाल्कनी, एलईडी टीव्ही, सेफ, स्मोक डिटेक्टर, लाईफ व्हेस्ट, स्प्रिंकलर्स, रेस्टॉरंट, स्पा, सनडेक, मुख्य डेकवर ४०-सीटर रेस्टॉरंट, बुफे काउंटर्स, कॉन्टिनेन्टल व भारतीय मेनू, वरच्या डेकवर सागवानी स्टीमर खुर्च्या, कॉफी टेबल्स, सुसज्ज बार.. सगळं आहे!

‘गंगा विलास’ २७ नद्या, ५ राज्ये आणि २ देशांमधून प्रवास करेल. हा प्रवास पर्यटकांना भारतीय उपखंडातील संस्कृती पाहण्याची एक उत्तम संधी प्रदान करतो. या प्रवासातील काही विशिष्ट भागच पाहण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी ‘हॉप-ऑन’ आणि ‘हॉप-ऑफ’ पर्याय देखील उपलब्ध असणार आहे..

पर्यटकांना दररोज ऑफशोअर आणि किनाऱ्यांवर उतरून विविध गोष्टींचा आनंद घेता येणार आहे, त्यासाठी ऑन-बोर्ड गाईड्स पर्यटकांना त्या भागातील संस्कृती आणि परंपरांबद्दल माहिती देतील. जहाजातून उतरल्यावर आजूबाजूच्या पर्यटन स्थळांवर नेण्याची व्यवस्था केलेली असणार आहे..

बांगलादेशात प्रवेश करण्यापूर्वी हे जहाज युनेस्को संरक्षित टायगर-रिझर्व्ह असलेल्या सुंदरबनमधून जाईल. भारतात पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी आणि आसाममधून पुढे जाण्यापूर्वी ते बरिसाल, बागेरहाट आणि ढाकामधूनही जाईल..

मोदी सरकारकडून पायाभूत सुविधांचे जे ‘न भूतो न भविष्यती’ असे जाळे देशभरात उभे केले जात आहे, त्या महत्वकांक्षी कामाचे नेतृत्व नितीनजी गडकरी करत आहेत. भारतातील जुन्या आणि दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या अंतर्देशीय जलमार्गांचे आधुनिकीकरण व कमर्शियलाझेशन करण्याच्या त्यांच्या व्हिजनमुळेच ही रिव्हर क्रूझ शक्य झाली आहे..

राष्ट्रीय जलमार्ग क्र. १ नेव्हिगेशनसाठी विकसित करण्यासाठी जागतिक बँकेच्या ४२०० कोटी सहाय्याने प्रकल्प जोरात सुरू आहे. NW-1 हा ४ राज्यांमधून जातो व हल्दिया, हावडा, कोलकाता, भागलपूर, पाटणा, गाझीपूर, वाराणसी व अलाहाबाद या शहरांना आणि गंगा खोऱ्यातील हजारो उद्योगांना वरदान ठरणार आहे..

पाच राष्ट्रीय जलमार्गांना एकमेकांशी जोडणे अवघड असले तरी जिकडे शक्य आहे तिकडे इंटिग्रेटेंड राष्ट्रीय जलमार्ग वाहतूक ग्रीड तयार करण्यात येत आहे. सध्या 3 जलमार्गांना जोडण्याचे काम सुरू आहे..

सध्या देशात केवळ ५ ‘नॅशनल वॉटरवेज'(NW) आहेत, जे येत्या काळात १०१ होणार आहेत. अनेक नद्या, कालवे, बॅक-वॉटर्स, खाडी, तलाव यांचा वापर तर होणारच आहे, त्यांना जलमार्ग बनवण्यासाठी एकमेकांशी जोडलेही जाणार आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *