Opinion
भारतात हायड्रोजन इंधन म्हणून कधी वापरले जाईल?
Shekhar Behere यांच्या फेसबुक पोस्ट वरून साभार
दोनच दिवसांपूर्वी एका ठिकाणी वाचण्यात आलं की, जर्मनी हा दुनियेतील असा पहिला देश बनतोय की तिथं हायड्रोजन फ्युएलने ट्रेन चालणार आहेत. असंच काहीसं पोलंड मध्ये ही रिसर्च आणि ट्रायल झाल्याची माहिती मिळाली पण जर्मनी या बाबत बराच पुढं सरकला आहे, ट्रेन नंतर अन्य फोर व्हीलर बाबतीत ही हायड्रोजन फ्युएल टेस्ट करणार असल्याचे समजते.
हायड्रोजन फ्यूएल हे सर्वात क्लीन फ्यूएल समजले जाते, कार्बन फुटप्रिंट हे निग्लीजिबल असल्याने डिझेल किंवा इलेक्ट्रीसिटीची गरज भासत नाही आणि ट्रेन या फ्युएलने चालवल्यावर शेकडो करोड रुपयांची बचत ही होणार आहे.
हे वाचल्यावर असा विचार करत होतो की, भारतात ही टेक्नॉलॉजी व लोकांचा माईंडसेट तयार व्हायला अजून १० ते १५ वर्ष लागतील, पण इथं मी पूर्णपणे चूक ठरलो, कारण भारतीय रेल्वेने हायड्रोजन फ्युएल वर काम सुरू केल्याचे माहिती मिळाली आणि आपण जर सरळ ट्रॅक वर जात राहू तर हैड्रोजन फ्युएलने रेल्वे चालवणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरेल आणि करोडो रुपये वाचतील. परिणामी रेल्वे तिकीट दर ही कमी होतील, भारतीय रेल्वे ने टेंडर-बिड्स मागवले आहेत. त्याअंतर्गत प्रायव्हेट लोकांना आमंत्रित केले असून त्यांच्या कडून डिझेल वर चालणाऱ्या ट्रेन ला हायड्रोजन फ्यूएल सेल लावण्याचे काम सुरू आहे, सोबतच या ट्रेनला सोलर पॅनल्स ही बसवले जात असून हा प्रोजेक्ट ऑक्टोबर मध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत. प्रथमतः हरियाणाच्या सोनीपत ते जींद या सेक्शनमधील दोन रेल्वे डेमो करणार आहेत.
सोलर पँनल द्वारे तयार होणाऱ्या विजेतून इलेक्ट्रोलेसिस करून, त्यातून हायड्रोजन वेगळं केलं जाणार आहे अन त्यानंतर हायड्रोजन फ्युएल सेल सिस्टीमने एनर्जी जनरेट करून ट्रेन चालवली जाणार आहे.
हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर डिझेल वर चालणाऱ्या सर्व रेल्वे हायड्रोजन फ्युएल वर मायग्रेट करून बचतीचा हा पर्याय अश्या पध्दतीने सेट केला जाणार आहे, फक्त दोन ट्रेन वर हा डेमो सक्सेसफुल झाला तरी एका वर्षाला २.३ करोड रु. ची बचत होणार आहे. आणि भारतात तर हजारो ट्रेन डिझेल वर चालणाऱ्या आहेत. मग अंदाज लावा किती बचत होऊ शकेल अन या टेक्नॉलॉजी चा वापर केल्याने कार्बन फुटप्रिंट (NO2) ११ किलो टन पर इयर कमी होईल. सर्वच रेल्वे जर हायड्रोजन फ्युएल वर चालत असतील तर हे प्रदूषण पण कायमचे कमी होईल.
हे काम सुरू होण्यापूर्वीच भारत सरकारने एक हजारच्या वर रेल्वे स्टेशन हे सोलर पॉवर्ड बनवले असून २०३० पर्यंत सर्वच रेल्वे स्टेशन हे सोलर पॉवर्ड होणार आहेत, या शिवाय सध्या ५० ट्रेन सोलर पॉवर वर चालवण्यासाठीचे काम सुरू आहे. प्लँटफॉर्म्स व स्टेशन्सची सफाई वर्ल्ड क्लास केली असून, प्रत्येक ट्रेन मध्ये बायो डिग्रेडेबल टॉयलेट बसविले आहेत, सुविधा वाढल्या आहेत, इनोव्हेशन वर काम सुरूच आहे.
हायड्रोजन फ्युएल सारखी टेक्नॉलॉजी आत्मसात केल्यावर भारत देश जगात अव्वल असणार यात शंका नाही.
ll जय हो ll
१५ आँगस्ट २०२१
https://www.facebook.com/behereshekhar