मेक इन इंडिया उत्पादनाना ओनलाईन विक्रेत्या अमेझोन कंपनीची मदत

मेक इन इंडिया उत्पादनाना ओनलाईन विक्रेत्या अमेझोन कंपनीची मदत

  1. Y. Team दि.२१ जुलै २०२०

मुंबईतील एका मध्यम वस्रोद्योग उद्योगाची बेड लिननची उत्पादने अमेरिकेतील अमेझोन च्या मार्केटमधील सर्वात जास्त लोकप्रीय उत्पादने बनली आहेत. बंगळूरूमधील एका इलेक्ट्रोनिक खेळणी उत्पादकाची उत्पादने भारता बाहेर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड अरब एमिरात या देशात विकली जातायत. अशा अनेक लघु आणि मध्यम उद्योजकांची मेड इन इंडिया उत्पादने अमेझोनच्या ग्लोबल सेलिंग प्रोग्राम अंतर्गत जगभराच्या अमेझोनच्या विक्री शृंखलेतून निर्यात होतायत. अमेझोन हि ओनलाईन किरकोळ विक्री ( Online Retail Sale – B to C  ) करणारी जगातील नामांकित कंपनी आहे. त्या कंपनीचा मुख्य धंदा किंवा मुख्य बिझनेस मोडेल जास्तीत जास्त उत्पादनांचे जास्तीत जास्त  पर्याय ग्राहकांना घरबसल्या ओनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे आहे. मालाचा दर्जा आणि योग्य किंमत या बाबत कंपनीचे नाव झालेले असल्याने जगभरात अनेक देशात कंपनीचे ग्राहक विखुरलेलं आहेत.

या कंपनीने भारतात आपला व्यवसाय सुरु केल्यावर मोदी शासनाच्या आग्रहामुळे २०१५ साली त्यांचा ग्लोबल सेल्स प्रोग्राम सुरु केला ज्याचा उद्देश भारतीय बनावटीच्या उत्पादनाना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा आहे. २०१९ मध्ये या प्रोग्रामद्वारा केलेल्या एकूण निर्यातीत १०० % वाढ होत एकूण ८००० कोटी रुपयाची निर्यात भारतातून करण्यात आली. सध्या या प्रोग्राम अंतर्गत दिल्ली,जयपूर,सुरात, इंदोर, मुंबई आणि बंगळूरू ई. शहरातील सुमारे ६०००० सूक्ष्म, लघु आणि मध्यम उत्पादक सामील असून सन २०२५ पर्यंत १० बिलियन डॉलर किमतीची या उत्पादकांनी उत्पादित केलेल्या मेड इन इंडिया उत्पादनांची निर्यात करण्याचे कंपनीचे उद्दिष्ठ असल्याचे कंपनीचे मुख्य आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी आघाडीवरचे नाव असलेले जेफ बेझोस ( Jeff Bezos ) यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

२००६ सालीसुरू झालेल्या मुंबईतील एन एम के टेकसटाइल चा मुख्य व्यवसाय किमती बेड लिननची अमेरिका आणि केनडा मधील मोठ्या डीपार्टमेंटल स्टोरना निर्यात करण्याचा व्यवसाय होता. २०१६ नंतर हा निर्यातीचा व्यवसाय मंदीत गेला. त्यानंतर कंपनीने अमेझोनच्या ग्लोबल सेल्स प्रोग्राममध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि आपला केलिफोर्निया डीझाइन डेन हा ब्रांड अमेझोन मार्केट प्लेस या अमेझोन कंपनीच्या नेटवर्क मध्ये सादर केला. मागच्या तीन वर्षात या कंपनीने प्रतिवर्षी १००% विक्री वाढ अनुभवली आहे आणि आता अमेझोनच्या जगभरातील नेटवर्क मध्ये हि कंपनी आपला माल विकते आहे. या कंपनीने २०२२ पर्यंत अमेझोन नेटवर्क मध्ये १० कोटी डॉलरची निर्यात करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे.

अमेझोन कंपनीतील वरिष्ठ अधिकारी गोपाल पिल्लई यांनी सांगितले कि केंद्रीय लघुउद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी अमेझोन कंपनीमुळे गेल्या काही वर्षात कोणत्या प्रकारच्या उत्पादनाना जागतिक बाजारपेठ मिळाली आणि आणखी कोणत्या उद्योगांना मिळू शकते याचा अहवाल मागितला आहे. या उद्योगांना आवश्यक शासकीय सहाय्य देता यावे या साठी श्री गडकरी यांनी या उद्योगांची यादी सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे वर्गीकरण करून मागितली आहे. चीनी मालाला पर्याय देण्यासाठी ८ लाख हस्तकारीगरांच्या उत्पादनाना अमेझोन कंपनीच्या “अमेझोन कारीगर” या शीर्षकाखाली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकंदरीत अमेझोन कंपनीच्या नेटवर्कचा फायदा घेऊन अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम भारतीय उद्योजकांना त्याची मेड इन इंडिया उत्पादने जागतिक बाजारपेठेत विकता येत आहेत.

====  +  ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *