रुपया बनतोय आतरराष्ट्रीय चलन

Economy अर्थव्यवस्था

रुपया बनतोय आतरराष्ट्रीय चलन 

Vinayak Ambekar दिनांक १९ मार्च २०२३

जगातील १८ देशा बरोबरचा भारताचा  आंतरराष्ट्रीय व्यापार आता रुपयात होणार आहे. आजपर्यंत जगातील बहुतांश अंतरराष्ट्रीय व्यापार हा फक्त अमेरिकन डॉलरमधेच करावा लागत होता. अर्थ राज्यमंत्री श्री भागवत कराड यांनी संसदेसमोर सादर केलेल्या माहिती नुसार  जगातील १८  देशामध्ये ६० स्पेशल रुपी व्होस्ट्रो अकाउंट ( Special Rupee Vostro Accounts ) उघडण्यास रिझर्व बँकेने परवानगी दिली आहे. या आधी हाती आलेल्या बातमी नुसार  सुमारे ५० देशांनी भारताबरोबरचा आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करण्याची  इच्छा व्यक्त केलेली आहे आणि रिझर्व बँक त्या बाबतची प्रक्रिया पूर्ण करून आणखी काही देशामध्ये हि खाती उघडण्यास परवानगी देईल. हि परवानगी परकीय आणि भारतीय अधिकृत व्यापारी बँकाना देण्यात आलेली आहे. या देशांबरोबर झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची देणी घेणी रुपयामध्ये देता घेता येतील. या मुले रुपया हा अंतरराष्ट्रीय व्यापाराचे चलन म्हणून वापरण्यास सुरुवात होईल. सध्या रशिया बरोबर आपण रुपयात व्यापार करीत आहोतच त्यात आणखी १७ देशांची वाढ झालेली आहे. मा. मंत्र्यांनी सांगितले कि रशिया आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलर वापरण्याच्या विरुध्द आहे व तसे सतत सांगत आहे. भारताने घेतलेला हा निर्णय भारताची निर्यात वाढवण्यासाठी घेतलेला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *